सकल मराठा परिवार

कर्म मराठा, धर्म मराठा!

मराठ्यांनी मिळून मराठ्यांच्या प्रगतीला हातभार लावूया आणि मराठा विकासाचे उद्दिष्ट प्राप्त करूया.

संस्थेचा परिचय

सकल मराठा परिवार (SMP) मराठा समाजाला मुख्यतः शैक्षणिक, व्यवसायिक, नोकरी व आर्थिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारी संस्था असून, सोबतच समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने वैद्यकीय क्षेत्रात समाजातील सर्व घटकांना सतत मदत करत आहे व भविष्यात करत राहणार आहे.

मिशन :- (short term) सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा तरुण पिढी मध्ये मराठा विकासाचे बीज रोवून एक कट्टर मराठा फळी तयार करणे.

व्हिजन :- (Long Term) मराठा समाजातील तरुण पिढीला भविष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, नोकरी, व्यावसायिक इत्यादी प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी आणणे.

आमचे ध्येय

आमच्या संघटनेचे सर्वात मोठे ध्येय समाजातील शहरी व ग्रामीण भागातील मराठा वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्धरीत्या प्रयत्न करणे आहे. आम्ही विविध शैक्षणिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, आणि रोजगार निर्मितीच्या संधींमधून समाजाचे सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

  • शैक्षणिक मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती प्रोत्साहन

  • आर्थिक व कौशल्य विकास प्रशिक्षण

  • समाजाच्या सर्व वर्गांमध्ये एकता आणि सामंजस्य निर्माण करणे

संस्थेचे सेवाकार्य

सकल मराठा परिवार ही संस्था मराठा समाजाच्या शैक्षणिक, व्यवसायिक, नोकरी, आर्थिक आणि वैद्यकीय प्रगतीसाठी कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात देण्याचा आमचा संकल्प आहे.

शैक्षणिक सहाय्य

शिक्षण क्षेत्रात प्रगतीसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करतो...

व्यवसायिक मार्गदर्शन

व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आणि संसाधने उपलब्ध करून देतो...

जिल्हा आणि तालुका स्तरावर नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन, वृद्धांसाठी आरोग्य शिबिरे, दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव...

वैद्यकीय सहाय्य
नोकरी व रोजगार क्षेत्र

समाजातील बेरोजगार मराठा तरुणांना नोकरी मिळावी या उद्देशाने नोकरीच्या संधी असलेल्या जाहिराती एका PDF मध्ये एकत्रित करून...

गडकिल्ले संवर्धन

आपत्कालीन मदत

महाराष्ट्रातील गडकिल्ले हे ऐतिहासिक वारसा आहेत आणि त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. सकल मराठा परिवार...

सकल मराठा परिवाराच्या माध्यमातून कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत २ वेळचे जेवण पुरविण्यात आले...

आमचे यश

सकल मराठा परिवार मधील मराठा बांधव समाजकार्यात जवळपास 2016 पासून काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मराठा समाजाच्या शैक्षणिक, व्यावसायिक, आरोग्य व नोकरी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये वेळोवेळी जमेल त्या पद्धतीने व वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. ही सर्व कामे करत असताना बऱ्याचदा समोरासमोर झालेल्या भेटी मधून असे निदर्शनास आले, की एका सुनियोजित आणि कॉमन प्लॅटफॉर्मची गरज आहे. म्हणूनच सकल मराठा परिवार मधील काही सदस्यांनी मिळून या संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला व त्या माध्यमातून वर नमूद केलेल्या उपक्रमा सहित इतरही बरेच मराठा हिताचे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सामील व्हा

आपल्या शंकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सकल मराठा परिवार मधील सदस्य व प्रतिनिधींना संपर्क करू शकता.

आर्थिक साहाय्य

सामील व्हा

संपर्क

आमच्यासोबत काम करत असताना आपल्याला कोणत्याही अनिवार्य प्रकारचे आर्थिक सहाय्य करण्याची गरज नाही, यामध्ये फक्त आपल्या सोयीनुसार वेळेची गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. (स्वेच्छेनुसार केलेले साहाय्य नक्कीच स्वीकारले जाईल.)

संघटनेमध्ये येण्याआधी आपली सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक पार्श्वभूमी काहीही असली तरी चालेल, फक्त ज्यावेळी सकल मराठा परिवार संघटनेसोबत जोडले जाल त्यावेळी स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि स्वार्थ यांना बाजूला ठेवून समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्याची तयारी असावी.

मराठ्यांनी मिळून मराठ्यांच्या प्रगतीला हातभार लावूया आणि मराठा विकासाचे उद्दिष्ट प्राप्त करूया.

आपल्या शंकांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सकल मराठा परिवार मधील सदस्य व प्रतिनिधींना संपर्क करू शकता.