नोकरी व रोजगार क्षेत्र
समाजातील बेरोजगार मराठा तरुणांना नोकरी मिळावी या उद्देशाने नोकरीच्या संधी असलेल्या जाहिराती एका PDF मध्ये एकत्रित करून त्या सोशल मीडिया च्या माध्यामातून मराठा तरुणांपर्यंत पोहोचवल्या जातात. यासोबत वेळोवेळी कॉर्पोरेट आणि सरकारी क्षेत्रातील नोकरी संदर्भात आपण Facebook/YouTube सारख्या माध्यमांचा वापर करून तज्ञ व्यक्तींचे live विडिओ घेऊन मार्गदर्शन केले जाते.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या कडून राबविल्या जाणार्या कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मराठा तरुणांना कौशल्य विकास आणि व्यक्तिगत विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
प्रमुख फायदे
व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास
बायोडाटा लेखन आणि मुलाखतीची तयारी
नोकरी प्लेसमेंट सहाय्य
उद्योजकता मार्गदर्शन आणि समर्थन
व्यावसायिक नेटवर्किंग संधी
सातत्यपूर्ण करिअर विकास प्रशिक्षण


