“सकल मराठा परिवार", पूरग्रस्त शेतकरी आणि शालेय विद्यार्थी यांना मदत !!!

Ganesh Bhanage

10/22/20251 मिनिटे वाचा

सकल मराठा परिवार वर्धापन दिन निमित्त बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये जाऊन पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

https://bedhadakmaharashtra.live/2025/10/skl-mratha-privar-cha-vrdhapn-din-utsahat-sajra/
सकल मराठा मराठा परिवाराच्या वतीने 'एक हात मदतीचा' उपक्रम..बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी अन्न धान्य, कपडे व शालेय साहित्य रवाना.. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लीक करा. 👇
https://youtu.be/9vUlc9fe7nc
सकल मराठा परिवार च्या वतीने पूरग्रस्त बीड परिसरात मदतकार्य
http://prasidhipramukhnews.blogspot.com/2025/10/blog-post_5.html
सकल मराठा परिवार मावळचा उपक्रम – पुरग्रस्तांना एक हात मदतीचा
https://sahyadrinama.in/सकल-मराठा-परिवार-मावळचा-उ/
सामजिक दायित्व य भावनेतून आज शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले,यावेळी शालेय साहित्य (वह्या. बॅग,पेन.पेन्सिल,रंगपेटी, पॅड)असे किट तयार करून वाटप करण्यात आले. हे वाटप करत असताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती एक निरागस हास्य होते त्यांच्या उज्वल भविष्यासाठी तर परिवाराच्या चेहऱ्यावरील आत्मिक समाधान हे वेगळं आनंद देऊन गेले. शाळेच्या वतीने परिवाराचे खूपच आभार मानण्यात आले.
एक हात मदतीचा हा उपक्रम सकल मराठा परिवार नाशिक संस्थेच्या वतीने राबविण्यात येत आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सकल मराठा परिवार पुढे आला असून नाशिक शहर जिल्ह्यातून दानशूर व्यक्तींनी दिलेल्या जीवनावश्यक वस्तू शालेय साहित्य,यांचे किट तयार करून वाटण्यात येत आहे.मुसळधार झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.आपल्याला जगवणारे शेतकरी बांधवांचे शेत,गोठा,गुर ढोर,उभी पिक,घर,या आसमानी संकटात वाहून गेली संसार उघड्यावर पडला आहे.त्याचे अतोनात हाल झाले त्यांचे दुःख आपण वाटून घेऊ शेकत नाही पण त्यावर मदतीची फुंकर घालू शकतो यासाठी शेतकरी बांधवांना आपल्या कडून थोडीशी मदत म्हणून आपला एक हात मदतीचा,कोणाच्या तरी आयुष्यात नवीन उमेद निर्माण करू शकतो.याकरिता सर्व नाशिककरांना मदतीचे आवाहनही सकल मराठा परीवाराच्या वतीने करण्यात येत आहे.या आवाहनास भरघोस प्रतिसादही मिळात आहे.तांदूळ,गव्हाचे पीठ,सर्व प्रकारच्या डाळी,भिस्कीट पुडे,फरसाण,तेल,पोहे,चहा पावडर,साखर,मॅगी ब्लॅंकेट,चादर,टॉवेल,बेडशीट,नवीन साडी मुलांसाठी शालेय दप्तर, वही पेन अशा वस्तू जमा करण्यात आल्या आहेत सर्व वस्तूंचे ३०० कीट करून बीड तालुक्यातील कट चिंचोली,यागावात वाटप करण्यात आले.यावेळी किट वाटप केल्याबद्दल गावाच्या वतीने सरपंच रवी निवारे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सकल मराठा परीवार संस्थेचे आभार व्यक्त केले.
एक हात मदतीचा
पूरग्रस्त भागामध्ये मदत पोहोचावी याकरता सकल मराठा परिवार ने एक हात मदतीचा हा उपक्रम राबवला होता यामध्ये सकल मराठा परिवारचे सदस्य संदीप भाऊ लांडगे या मध्ये सहभाग घेऊन उत्सव होम्स को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी पुणे नाशिक हायवे भोसरी पुणे 39
अध्यक्ष- सुनील आप्पा काळजे व फेडरेशन टीम आणि सोसायटीतील सर्व सदस्य या बांधवांनी आपण केलेल्या आव्हानाला साथ देत जवळपास दीड टन किराणा किट बनवून तसेच तालुका परांडा जिल्हा धाराशिव
या ठिकाणी जाऊन वाटप करण्यात आले त्यावेळी सकल मराठा परिवारचे जिल्हा समन्वयक वैभव ढोकले संदीप भाऊ लांडगे उपस्थित होते
तुम्ही केलेल्या मदतीने आज त्या गावात दिवाळी सण साजरा करण्यात आला यामध्ये तुमचा मोलाचा हातभार लागला
उत्सव होम्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी मधील सर्व सदस्य अध्यक्ष आणि सन्माननीय पदाधिकारी सर्वांचे खूप खूप आभार
सकल मराठा परिवार (SMP) एडमिन पुणे यांच्या वतीने उपस्थित श्री.महेश रणदिवे आणि श्री. वैभव ढोकले