सकल मराठा परिवार महारक्तदान शिबिर २०२५ – राज्यभरातून १०९३ रक्त पिशव्यांचे संकलन 🩸🚩

सकल मराठा परिवार (SMP) तर्फे आयोजित “महारक्तदान शिबिर २०२५” हा राज्यव्यापी उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांतून एकूण १०९३ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. समाजातील युवक-युवती, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संस्था/ब्लड बँक यांच्या सहकार्यामुळे हे अभियान प्रेरणादायी ठरले.

Ganesh Bhanage

12/6/20253 मिनिटे वाचा

सकल मराठा परिवार महारक्तदान शिबिर २०२५ – राज्यभरातून १०९३ रक्त पिशव्यांचे संकलन 🩸🚩

सकल मराठा परिवार (SMP) तर्फे आयोजित “महारक्तदान शिबिर २०२५” हा राज्यव्यापी उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांतून एकूण १०९३ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. समाजातील युवक-युवती, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संस्था/ब्लड बँक यांच्या सहकार्यामुळे हे अभियान प्रेरणादायी ठरले.

🩸 जिल्हानिहाय/ठिकाणनिहाय रक्त पिशवी संकलन (दिनांक, ब्लड बँकसह)

  • ◻️ सोलापूर – एकूण 49
    • ठिकाण: बीटर गाव, सोलापूर

      • तारीख: 3 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: अक्षय ब्लड बँक

      • रक्त पिशव्या/Donor count: 49

    ◻️ नाशिक – एकूण 251
    • दिंडोरी 1

      • तारीख: 15 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: विभागीय सेवा संदर्भ

      • Donor count: 51

    • नाशिक शहर

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: (माहिती उपलब्ध नाही)

      • Donor count: 111

    • दिंडोरी 2 (Pernod Ricard India Pvt. Ltd.)

      • तारीख: 19 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: अर्पण ब्लड बँक

      • Donor count: 89

    ◻️ पुणे – एकूण 361
    • औंध

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: हिंजवडी ब्लड बँक

      • Donor count: 42

    • चिंचवड

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: PSI ब्लड बँक / अक्षय ब्लड बँक

      • Donor count: 75

    • कुरुळी

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: अक्षय ब्लड बँक

      • Donor count: 8

    • चाकण

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: चाकण ब्लड बँक

      • Donor count: 48

    • मावळ 1

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: लाइफ लाइन ब्लड बँक

      • Donor count: 82

    • मावळ 2

      • तारीख: 19 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: अक्षय ब्लड बँक

      • Donor count: 106

    ◻️ रायगड – एकूण 69
    • रोहा

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: न्यू मुंबई ब्लड बँक

      • Donor count: 28

    • महाड

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: जनकल्याण ब्लड बँक, महाड

      • Donor count: 11

    • श्रीवर्धन

      • तारीख: 17 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: अलिबाग सिव्हिल ब्लड बँक

      • Donor count: 30

    ◻️ लातूर – एकूण 53
    • लातूर शहर

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: MIT कॉलेज ब्लड बँक

      • Donor count: 53

    ◻️ छत्रपती संभाजीनगर – एकूण 35
    • छत्रपती संभाजीनगर शहर

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: दत्ताजी भाले ब्लड बँक

      • Donor count: 35

    ◻️ अहिल्यानगर – एकूण 70
    • अहिल्यानगर शहर

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: जिल्हा ब्लड बँक

      • Donor count: 30

    • शेवगाव

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: सुरभी ब्लड बँक

      • Donor count: 40

    ◻️ बीड – एकूण 38
    • गोंदी खुर्द

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: सिटी ब्लड बँक

      • Donor count: 24

    • हिंगणगाव

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: सिटी ब्लड बँक

      • Donor count: 14

    ◻️ जळगाव – एकूण 7
    • भडगाव

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: रेड क्रॉस ब्लड बँक

      • Donor count: 7

    ◻️ कोल्हापूर – एकूण 70
    • कोल्हापूर शहर

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: जीवनधारा ब्लड बँक

      • Donor count: 40

    • बांबवडे

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: जीवनधारा ब्लड बँक

      • Donor count: 30

    ◻️ बुलढाणा – एकूण 25
    • शेगाव

      • तारीख: 16 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: सिव्हिल ब्लड बँक, खामगाव

      • Donor count: 25

    ◻️ परभणी – एकूण 38
    • (परभणी)

      • तारीख: 23 नोव्हेंबर 2025

      • ब्लड बँक: जिजाऊ ब्लड बँक

      • Donor count: 38

    ◻️ सिन्नर – एकूण 29
    • (सिन्नर)

      • तारीख: 29/11/2025

      • ब्लड बँक: (माहिती उपलब्ध नाही)

      • Donor count: 54

    ◻️ कटचींचोली (ता. गेवराई, जि. बीड) – एकूण 30
    • ठिकाण: निळकंठेश्वर मंदिर, कटचींचोली

      • तारीख: 04/12/2025 (गुरुवार)

      • वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 4:00

      • आयोजक: समस्त ग्रामस्थ व तरुण मंडळ, कटचींचोली, ता. गेवराई, जि. बीड

      • Donor count: 30

या माध्यमातून शेकडो रुग्णांचे अमुल्य प्राण वाचविण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांचाही उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून विशेष गौरव

आज आयोजित रक्तदान शिबिराच्या निमित्ताने राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा. श्री पुरुषोत्तम पुरी सर यांनी Google Meet च्या माध्यमातून सकल मराठा परिवार संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
त्यांनी राज्यभर एकाच दिवशी शिस्तबद्धपणे राबवलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, भविष्यातही अशाच आरोग्यविषयक जनजागृती मोहिमा राबविण्याचे आवाहन केले.

माध्यमांतून मिळालेला प्रतिसाद

महारक्तदान शिबिराला विविध वृत्तमाध्यमांनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे.

(वरील वृत्तांतांमध्ये स्थानिक स्वयंसेवक, मान्यवर व रक्तदात्यांच्या प्रतिक्रिया पाहता येतील.)

स्वयंसेवक व रक्तदाते – उपक्रमाचे खरे नायक

प्रत्येक जिल्ह्यातील SMP समन्वयक, स्थानिक मंडळे, वैद्यकीय अधिकारी, ब्लड बँक कर्मचारी व स्वयंसेवकांनी मोठी जबाबदारी सांभाळली.
नोंदणी, हेल्थ चेक-अप, रक्तसंकलन आणि अल्पोपहार या सर्व टप्प्यांत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम केले.

विशेष म्हणजे:

  • अनेक युवक-युवतींनी पहिल्यांदाच रक्तदान करून पुढील वर्षीही नक्की सहभागी होण्याची ग्वाही दिली.

  • महिलांचा सहभागही लक्षणीय राहिला; अनेक माता-भगिनींनी आपल्या कुटुंबीयांसह येऊन रक्तदान केले.

  • काही ठिकाणी थोरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व वाढदिवस/विशेष दिनानिमित्त रक्तदान करणारे दातेही दिसून आले.

पुढील वाटचाल

सकल मराठा परिवार फाउंडेशन पुढील काळात:

  • नियमित रक्तदान शिबिरे,

  • आरोग्य तपासणी शिबिरे,

  • अवयवदान, थॅलेसीमिया जागृती इत्यादी सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करीत आहे.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या:

  • सर्व रक्तदाते,

  • वैद्यकीय अधिकारी व ब्लड बँक कर्मचारी,

  • पोलिस व स्थानिक प्रशासन,

  • मंदिर/शाळा/समाज हॉल विश्वस्त मंडळे,

  • तसेच वृत्तमाध्यम प्रतिनिधी

यांचे मनःपूर्वक आभार.

“तुमचे एक रक्तदान – अनेकांच्या जीवनाचे नवे प्राणदान”
SMP परिवार आपल्याला पुढील सामाजिक उपक्रमांतही असाच सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करतो.