स्पायनल कॉर्ड इंज्युरी पुणे सेंटर येथे सकल मराठा परिवाराची भेट; दिव्यांग बांधवांसाठी मदत, मार्गदर्शन आणि मोफत व्हीलचेअर उपक्रम

सकल मराठा परिवार यांच्या सौजन्याने आज स्पायनल कॉर्ड इंज्युरी पुणे सेंटर येथे भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान जालन्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली. तसेच दिव्यांग भवन यांच्या सौजन्याने त्यांना मोफत व्हीलचेअर देण्यात आली.

Ganesh Bhanage

3/10/20261 मिनिटे वाचा

सकल मराठा परिवार यांच्या सौजन्याने आज स्पायनल कॉर्ड इंज्युरी पुणे सेंटर येथे भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान जालन्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली. तसेच दिव्यांग भवन यांच्या सौजन्याने त्यांना मोफत व्हीलचेअर देण्यात आली.

या केंद्रात दिव्यांग बांधवांना फक्त मदतच नाही, तर स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाते. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा, दैनंदिन कामे स्वतः कशी करायची, तसेच पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बाहेर कसे जायचे याबाबत येथे विशेष मार्गदर्शन केले जाते.

याशिवाय, दिव्यांग व्यक्तींमध्ये जर कोणी इतर क्षेत्रांमध्ये प्रगतीशील असेल, तर त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना योग्य नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. एखादा व्यक्ती खेळाडू असल्यास त्याला टॉप लेव्हल स्पर्धांसाठी पुढे नेण्याचेही काम येथे केले जाते. अशा अनेक उपयुक्त आणि प्रेरणादायी गोष्टी दिव्यांग बांधवांना येथे शिकवल्या जातात.

आपल्या परिसरात किंवा ओळखीमध्ये कोणी दिव्यांग बांधव असतील, तर सकल मराठा परिवार पुणे जिल्हा टीम शी बिनधास्त संपर्क साधा. त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.

मदतीसाठी संपर्क

  • सारिका ताई संतोष कड — 7972388429

  • विजय कदम — 9730988503

  • सुभाष पिंगळे — 9730308108

  • पंकज पाटील — 9145344231

सकल मराठा परिवार — सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि दिव्यांग बांधवांसाठी स्वावलंबनाचा मजबूत आधार.