पालखी वारीतील समाजसेवेचा नवा अध्याय – सकल मराठा परिवार
महाराष्ट्राच्या भक्ती, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक असलेल्या पंढरपूरच्या पालखी वारीत यावर्षी सकल मराठा परिवार, पुणे यांनी समाजसेवेचा एक नवा अध्याय घडवला.


राम कृष्ण हरी!
महाराष्ट्राच्या भक्ती, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक असलेल्या पंढरपूरच्या पालखी वारीत यावर्षी सकल मराठा परिवार, पुणे यांनी समाजसेवेचा एक नवा अध्याय घडवला.
सकल मराठा परिवार, पुणे यांच्या वतीने गेल्या आठवड्यात दिंडीतील वारकऱ्यांसाठी रविवार पेठ, पुणे येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार सेवा करण्यात आली.👏👏२१ जून २०२५ रोजी पुणे परिसरातील पालखी मुक्कामी येणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी मोफत मेडिकल कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना पुढील प्रवासासाठी आवश्यक असणारी औषधे मोफत वाटण्यात आली. यासोबतच छत्र्या, रेनकोट, मोबाईल पाऊच आणि फराळाचे पदार्थ यांचेही वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात या मदतीमुळे अनेक वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला. थकलेल्या दमलेल्या वारकऱ्यांना विचारपूस करून एक मायेचा आधार देण्याचा प्रयत्न केला गेला.😇
या उपक्रमात समाजातील अनेक स्वयंसेवक, डॉक्टर आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व औषधे प्रमाणित डॉक्टरांच्या देखरेखीखालीच वाटण्यात आली, त्यामुळे वारकऱ्यांना योग्य आणि सुरक्षित उपचार मिळाले. या उपक्रमात परिवारातील ज्या डॉक्टर्स बांधवांनी आणि इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि सेवाभावाने आपले कर्तव्य बजावले, 🙏त्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏
सर्वांनी छान सहकार्य केले, व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेतला त्या सर्वांचे आणि ज्यांनी वेळात वेळ काढून उपक्रम ठिकाणी भेट दिली, डॉक्टर , नर्स, स्वयंसेवक, सर्व ताई, IT टीम, विशेष करून पुणे टीम, रायगड टीम, नगर टीम, कोल्हापूर टीम आपल्या सर्वांचे शतश: आभार ❣️❣️😍😍उपक्रमाला सर्वांनी छान सहकार्य केले. महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्ह्यातील💪 एडमिन टीमने या उपक्रमाला भेट दिली. या सर्व बंधूंचे ताईंचे मनःपूर्वक आभार ‼️👏आपल्या कार्याची दखल आणि नाव संपूर्ण महाराष्ट्रतात tv वर झळकत आहे या क्षणा बद्दल श्री. संदीप पाठक सर यांचे सुद्धा विशेष आभार ! आज SMP टीम संपूर्ण महाराष्ट्र भर TV📺 वर दिसत आहे. सर्वांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या टीम चे पुण्यकर्म पाहु शकता. 🎉🎊https://youtu.be/smSnKFRBHm4?si=KPHZD-lho_Ct3sJW
या सेवाकार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकाचे, दानशूर व्यक्तींचे आणि डॉक्टरांचे सकल मराठा परिवार, पुणे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार. तुमच्या ह्या शिवकार्याला मनस्वी सलाम 🙏 आपला हा सेवाभाव असाच निरंतर राहो, ही पांडुरंगा चरणी प्रार्थना 😌
या उपक्रमामुळे समाजातील एकता, सेवा आणि समर्पणाची भावना अधिक दृढ झाली.
एकत्र येऊन समाजासाठी प्रेरणा बनण्याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला.
जय हरि विठ्ठल!
🚩कर्म मराठा धर्म मराठा🚩
⛳सकल मराठा परिवार®(SMP)⛳


