सकल मराठा परिवार चौथा वर्धापन दिन सोहळा २०२५ - बीड
५ ऑक्टोबर २०२५ रोजी, बीड येथे आयोजित करण्यात आलेला सकल मराठा परिवारचा ' वर्धापन दिन'. हा सोहळा केवळ एक उत्सव नव्हता, तर तो आपल्या संघटनेच्या ऐतिहासिक परंपरेचे स्मरण, वर्तमानातील कार्याचा आढावा आणि भविष्यासाठीची दिशा ठरवणारा सोहळा होता.


सर्वांना,
सस्नेह जय जिजाऊ! जय शिवराय!.🙏
मी सहसा समाजमाध्यमावर जास्त व्यक्त होत नाही. पण आज विषयच असा आहे की थोडं लिहावं म्हटलं.😊
असं म्हणतात की, आपण करत असलेल्या कामाचे वेळोवेळी सिंहावलोकन जरूर केले पाहिजे, आणि हाच उद्देश समोर ठेवून ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, बीड येथे आयोजित करण्यात आलेला सकल मराठा परिवारचा ' वर्धापन दिन'. हा सोहळा केवळ एक उत्सव नव्हता, तर तो आपल्या संघटनेच्या ऐतिहासिक परंपरेचे स्मरण, वर्तमानातील कार्याचा आढावा आणि भविष्यासाठीची दिशा ठरवणारा सोहळा होता. कार्यक्रमाचे उद्घाटन आपले प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आणि श्री क्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी महंत संभाजी बाबा यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी बाबांनी शुभेच्छा व प्रोत्साहन दिले. सकारात्मक कामासाठी नारायणगडाचा आशीर्वाद नेहमीच लाभला आहे🙏. संघर्षयोद्धा मा. मनोजदादा जरांगे पाटलांना सुद्धा वर्धापन दिनाचे निमंत्रण देण्यात आले होते परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू असल्याने दादा येऊ शकले नाहीत पण मनोजदादांच्या शुभेच्छा मा. गंगाधर नाना काळकुटे यांच्यामार्फत पोहचल्या.🚩
सध्याच्या परिस्थितीत एखाद्या समाजाविषयी बोलले गेले की लगेच शिक्का बसतो, की हा अमुक-तमुक विचाराचा आहे.पण आमच्यासारख्या युवकांनी सर्व कसोटींवर पडताळूनच, एखाद्या संघटनेत काम करावं तसं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सकल मराठा परिवार(SMP) म्हणजे एक 'शाश्वत काम' उभे करण्यासाठी तयार झालेली संघटना. इतर समाजघटकांचा द्वेष न करता 'सकारात्मक दृष्टीने' आपले काम करण्याचा प्रयत्न करणारी संघटना म्हणजे सकल मराठा परिवार.
संघटनेची ओळख: -
जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या अपार संस्कारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, ज्यांनी स्वराज्य स्थापून शोषितांना न्याय दिला. “शिवचरित्र म्हणजे प्रेरणागाथा,
स्वराज्य म्हणजे लोकशाहीचे मूळ बीज.” छत्रपती संभाजी महाराजांनी,"राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य" हे बिरूद अंगी बानवून प्रसंगी,स्वराज्याची, स्वाभिमानाची रक्षा करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचत शिक्षण, आरक्षण आणि समाजोद्धाराचे कार्य केले. महात्मा जोतिराव फुले यांनी शिक्षण हे समाजउद्धाराचे शस्त्र असून स्त्रियांनाही मुख्य प्रवाहात आणले व बहुजन समाजाला मोठा राजमार्ग दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या मंत्राने बहुजन समाजाला उभारी दिली. हे सर्व समाजसुधारक बोलूनच थांबले नाहीत तर त्यांनी याला कृतीचीही जोड दिली. "बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले" असं म्हणतात ते खरं आहे. आज सकल मराठा परिवाराचे कार्य ह्याच महामानवांच्या विचारांशी सुसंगत ठरण्याचा लहानसा प्रयत्न आहे. शिव-शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार खोलवर रुजवण्यासाठी, भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी या वर्धापन दिनाला महाराष्ट्राच्या विविध भागातून/जिल्ह्यांतून अनेक समन्वयक उपस्थित होते. आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाच्या उद्धारात एक 'खारीचा वाटा' उचलला जावा हे सर्वांनाच मान्य आहे.
अनेक असे उदाहरणे देता येतील की, जेव्हा कुणाला तात्काळ मदत हवी आहे तेव्हा जातपात न पाहता SMP मदतीला धावून आला आहे. कोविड- १९ च्या काळात तर अनेकांना विविध वैद्यकीय सेवा, आपत्कालीन मदतकार्य,रोजगार सेवा , रक्ताचा तुटवडा पडला होता तेव्हा, हाच सकल मराठा परिवार जातपात न पाहता हजारो रक्तपिशव्या घेऊन सेवेस उभा राहिला. आणि पुढेही उभा असेल. आणि आत्ता बीड येथील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येतानाही विशेषतः नाशिक व पुणे टीम रिकाम्या हाताने न येता अतिवृष्टीग्रस्त भागातील गरजूंना संसारोपयोगी वस्तूंची मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सोबत आणली.❤️ (कट चिंचोली, ता गेवराई, धारवंटा).
सकल मराठा परिवार (SMP) समाजातील तरुणाईला शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कार्यरत आहे. "कर्म मराठा, धर्म मराठा" -- हे फक्त ब्रीदवाक्य नाही, तर आमच्या प्रत्येक कार्यामागील ऊर्जा आहे.
संघटनेचे कार्य थोडक्यात :-
सकल मराठा परिवारने समाजासाठी कार्य करताना नेहमीच,“Be the change that you wish to see in the world” ला प्राध्यान्य दिले आहे. 🌱
SMPकडून ग्रामीण व शहरी भागात शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे, शिष्यवृत्ती उपक्रम, आरोग्य शिबिरे, गरीब रुग्णांना सहाय्य, व्यवसाय व उद्योग, सारथी मार्फत पाठपुरावा करून विविध योजना राबवणे आणि IT क्षेत्रातील जॉब ॲलर्ट्स, रोजगार व नोकरी , आपत्कालीन मदतकार्य, गडकिल्ले संवर्धन आणि आरक्षण लढा अशा विविध क्षेत्रांत काम केले जाते.
सकल मराठा परिवारच्या महाराष्ट्र संघटनेने यावर्षीचा ' वर्धापन दिन', आयोजित करण्याची मोठी जबाबदारी 'TEAM BEED' वर सोपवली होती. आणि सर्व महाराष्ट्रातील समन्वयकांचे आदरातिथ्य, स्वागत करण्याची संधी दिल्याबद्दल 'टीम बीडकडून' सर्वांचे मनापासून आभार!..🙏
सदर कार्यक्रमात डॉक्टर, वकील, प्राध्यापक/शिक्षक, समाजसेवक अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. महाराष्ट्रभरातून आलेल्या जिल्हा समन्वयकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मलाही TEAM BEEDच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत संदेश भाषणाची संधी मिळाली. सकाळच्या सत्रानंतर सर्वांनी जेवण ब्रेक, दुपारच्या सत्रात जिल्ह्यानुसार एकमेकांच्या ओळखी सांगून झाल्या आणि बराच वेळ कामाविषयी विचारमंथन झाले. #Brainstorming
देशभरात जिथेही मराठा समाज आहे तिथे तो स्वाभिमानाने आणि मेहनतीने कष्ट करत आलेला आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मराठा समाज म्हणजे गावगाड्यात आजपर्यंत सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालणारा समाज, मायाळू, प्रसंगी आक्रमक, प्रामुख्याने शेती करणारा- कुणबी, संख्येनेही जास्त म्हणून त्याला मोठ्या भावाची उपमा दिली जाते आणि ती योग्य पद्धतीने मराठा समाजाने निभावली व पुढेही निभावेल असे मला वाटते. जसजशी देशाची लोकसंख्या वाढत गेली पण भौगोलिक क्षेत्र मात्र तेवढेच राहिले व पुढे जमिनींचे तुकडीकरण/वाटण्या होत गेल्या. शेतीसाठी क्षेत्र कमी झाले परिणामी उत्पन्न कमी होत गेले आणि गरजा वाढल्या. मराठवाड्यात तर याउपर निसर्गाची अवकृपा, रोजगाराच्या नगण्य संधी म्हणून स्थलांतर, खासगी सावकारांचे कर्ज, infrastructure ची वानवा, शेतीतून उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्चच जास्त निघतो वरून हमी भावाचा प्रश्न, त्यात भर म्हणजे वेळोवेळच्या राज्यकर्त्यांनी म्हणावे तसे धोरणे राबवली नसण्याची शक्यता, आर्थिक विवंचना, परिणामी कृषक वर्गाची आत्महत्या वाढणे आणि तरुणांमधील अस्वस्थता. हे सर्व दुष्टचक्र (Vicious cycle ♻️ ) आहे, ज्यातून सुटकेच्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे ' शिक्षणं ' जो शाश्वतही आहे. जो मार्ग शाहू महाराज आणि इतर अनेक थोर समाजसुधारकांनी तयार केला. (याबाबतीत याआधीही लिहिले आहे- Pinned Post📌)
शिक्षणासाठी आरक्षणाचा लढा सुरूच राहील पण आरक्षणासाठी लढताना इतरही क्षेत्रांत एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे.(यात काहीही वावगे नाही, कारण आपण देशभरात अनेक community च्या व्यावसायिक, प्रशासकीय,शैक्षणिक, इ संघटना पाहतो त्या संघटनाही सकारात्मक कामाने राज्याच्या/देशाच्या विकासात हातभारच लावत आहेत). हेच SMP चे ध्येय आहे.आणि त्याच दिशेने संघटनेचे मार्गक्रमण सुरू आहे.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून आलेल्या समन्वयकांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, येणारा काळ कसा असेल आणि प्रगतीच्या नव्या संधींविषयी चांगले मार्गदर्शन लाभले आणि हे विचारमंथन वेळोवेळी असेच अविरत,अविचल चालू राहील हा विश्वास आहे. 'टीम बीड'मधील सर्व सदस्यांनी अपार मेहनतीने कमी वेळात कार्यक्रम आयोजित करून , चोख नियोजन करून (इतके की, सगळ्यांना जेवू घालणारे आचारी भाऊ, Soundsystem ऑपरेटर, ते स्वच्छता करणाऱ्या मावशींनाही सन्मानित केले👏🏻.) मोठ्या उत्साहात सोहळा यशस्वी करून दाखवला त्याबद्दल सर्वांचे कौतुक.🫂
'टीम बीडकडून' सर्वांचे मनःपूर्वक स्वागत व सेवेची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप आभार!..🤝
- चि.दिग्विजय काळे 🖋️
#वर्धापनदिन #SMP #अतिवृष्टी
#सकल_मराठा_परिवार #विचारमंथन #सिंहावलोकन #MarathaReservation #ओला_दुष्काळ #manojjarangepatil #मराठा #एकजूट #बीड #महाराष्ट्र #brainstorming #मराठवाडा #शाश्वत_काम


