शिवजयंती 2026 | सकल मराठा परिवाराचे नाशिक–पुणे–रायगड–छत्रपती संभाजीनगर–बीड येथील उपक्रम
शिवजयंती 2026 निमित्त SMP तर्फे नाशिकमध्ये वृक्षारोपण, पुण्यात शिवजन्मोत्सव सोहळा, रायगडमध्ये वक्तृत्व स्पर्धा, संभाजीनगरमध्ये पाणी वाटप आणि बीडमध्ये आरोग्य-दंत तपासणी व रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
1) नाशिक: वृक्षारोपणातून शिवजयंती साजरी
नाशिक येथे सकल मराठा परिवाराच्या वतीने मनपा शाळा क्रमांक 49, पंचक येथे शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून आगळी-वेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे गडकोट आणि निसर्गाचे जतन केले, त्याच प्रेरणेने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि भविष्यातील पिढीने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, या उद्देशाने प्रत्येक रोप हे शिवप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून लावण्यात आले.
🌱 “वृक्षारोपण हीच खरी शिवसेवा!”
या उपक्रमासाठी आपलेत पर्यावरण संस्थेचे श्री. शेखर गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी त्यांनी वृक्षारोपणाची योग्य पद्धत तसेच झाडांच्या विविध प्रजातींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
उपस्थित सहकार्य: ऍड. सुनील आण्णा बोराडे (शालेय समिती अध्यक्ष), केंद्रप्रमुख श्री. गोपाल बैरागी सर, श्री. योगेश निसाळ, मुख्याध्यापिका विमल रायते (ढिकले) तसेच शाळेतील शिक्षक-शिक्षिका आणि सर्व सहकारी.
SMP उपस्थित: श्री. खंडूभाऊ आहेर, प्रकाश बोराडे, योगेश वरखडे, संजय गोरडे, संजय झारोळे, कैलास देशमुख, धनाजी आगळे, स्नेहल काळे, सिंधुताई पगार.
शाळा परिसरात बकुल, बेहडा, तामण, कुसुम, कांचन अशा विविध 30 फुल/फळझाडांची लागवड करण्यात आली.
🌿 एक झाड — एक आशा, एक भविष्य!






































2) पुणे: भक्ती शक्ती येथे शिवजन्मोत्सव सोहळा 2026 महानाट्याला SMP टीमची सदिच्छा भेट
पुणे येथे भक्ती शक्ती येथे आयोजित “शिवजन्मोत्सव सोहळा 2026” या महानाट्याला सकल मराठा परिवार पुणे टीम समन्वयकांनी उपस्थित राहून सदिच्छा भेट दिली. या वेळी म्हस्के दादा, पंकज पाटील, संग्राम मगर, विजय कदम, सारिका ताई कड उपस्थित होते.
SMP पुणे टीमकडून विजय कदम सर कुटुंबासह उपस्थित असताना त्यांची रणरागिणी शिवकन्या मृणाली विजय कदम हिने अंगावर शहारे आणणारी शिवगर्जना केली. इतक्या लहान वयात शिवगर्जना साकार होणे म्हणजे त्यांच्या कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार येणाऱ्या पिढीत रुजवण्याचे कार्य केले, असे प्रेरणादायी उदाहरण ठरले.
सर्व बांधवांना शिवजन्मोत्सवाच्या सहस्र कोटी शिवसदिच्छा! 🚩
3) रायगड (खोपोली): शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा
सकल मराठा परिवार रायगड टीम तर्फे खोपोली नगरपरिषद शाळांमध्ये शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकौशल्य, आत्मविश्वास आणि शिवविचार रुजवण्याचा हेतू होता.
दिनांक: 19 फेब्रुवारी 2026
ठिकाणे व वेळा :
नगरपरिषद शाळा, स्वातंत्रवीर सावरकर शाळा क्र. 1 – सकाळी 7:30
लीना हेरिटेज को-ऑप. सोसायटी, चिंचवली शेकिण, खोपोली – सकाळी 11:00
नगरपरिषद शाळा, वासुदेव बळवंत फडके शाळा क्र. 8 – सकाळी 7:30
संपर्क: सौ. रुपालीताई शंकर पिलाने
4) छत्रपती संभाजीनगर: क्रांती चौक येथे पाणी वाटप
सकल मराठा परिवार टीम छत्रपती संभाजीनगर तर्फे क्रांती चौक येथे शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने पाणी वाटप उपक्रम राबवण्यात आला. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना मदत व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
5) बीड: मोफत आरोग्य, दंत तपासणी आणि रक्तदान शिबिर
19 फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा परिवार बीड, रयत विकास प्रतिष्ठान आणि खेडकर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवजयंतीचा उत्सव केवळ जल्लोषापुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिरासोबतच मोफत आरोग्य तपासणी व दंत तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ अनेक गरजू रुग्णांनी घेतला.
याचप्रसंगी रामनगर येथील 'स्नेहसावली फाउंडेशन'च्या बालकाश्रम व वृद्धाश्रमामध्ये शैक्षणिक साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये मानवतेची जाणीव अधिक दृढ झाली.
शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर खेडकर क्लिनिकचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टरांचे पथक, सकल मराठा परिवारचे समन्वयक व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले. शिवजयंतीचा उत्सव सेवा, आरोग्य व समाजहिताच्या कार्यातून साजरा करण्याचा आदर्श या उपक्रमाने निर्माण केला.
दिनांक: गुरुवार, 19 फेब्रुवारी 2026
वेळ: सकाळी 11 वाजता
स्थळ: माजळी मंगल कार्यालय समोर, नगर रोड, बीड
या उपक्रमातून आरोग्य-जागरूकता वाढवण्यासोबतच रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
🩸 “Donate blood, save lives.”
आपल्या एका रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया करणारे तसेच गंभीर आजारी रुग्णांचे प्राण वाचू शकतात—हा संदेश यानिमित्ताने अधिक प्रभावीपणे पोहोचला.


शिवजयंती 2026 निमित्त राबवलेले हे सर्व उपक्रम समाजहित, सेवाभाव, पर्यावरण संवर्धन आणि शिवविचार प्रसार यांची परंपरा पुढे नेणारे ठरले.
🚩 सकल मराठा परिवार (SMP) | कर्म मराठा, धर्म मराठा 🚩


